भरधाव कारची भिंतीला धडक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२१

भरधाव कारची भिंतीला धडक

भरधाव कारची भिंतीला धडक,जीवितहानी नाही,आरोपीला अटक
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या दाभा टर्निंग परीसर अमरावती रोड वाडी येथे सोमवार २९ मार्च रोजी होळीच्या पाडव्याला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आरोपी प्रशांत सावरकर रा . जुना फुटाळा विद्यापीठ परिसर अमरावती रोड नागपूर हा गाडी क्र एम एच ३१ -एफ ई८८९७ हुंडाई वेन्यू कार दारूच्या नशेत भरधाव वेगाने,बेजबाबदारपणे व धोकादायक रित्या चालवीत असताना तैनात एमआयडीसी वाहतूक शाखेच्या पोलीसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने अमरावती रोड वाडी येथील रेनबो वाईन शॉपजवळील बंद असलेल्या चाय दुकानाच्या बाजूच्या भिंत व पिल्लरला जोरदार धडक दिली त्यात भिंत व कारचे नुकसान झाले.घटनास्थळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी भेट दिली. फिर्यादी वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरिक्षक गोपिका कोडपे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी कलम२७९, ४२७ भादवीनुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक जी .ए. मोघे पुढील तपास करीत आहे.