तरुणांचा मृतदेह विहरीत सापडला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२६ मार्च २०२१

तरुणांचा मृतदेह विहरीत सापडला

तरुणांचा मृतदेह विहरीत सापडला
लाव्हा येथील घटना, हत्या की आत्महत्या
हत्या केल्याचा आईचा आरोप
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
खर्रा आणण्यासाठी दुकानात गेलेला मुलगा घरून गेल्यावर परतच न येता त्याचा मृतदेह पोलीस स्टेशन हद्दीतील विहीरीत मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडवून हत्या की आत्महत्या या चर्चेला उधाण आले आहे.
प्राप्त पोलीस माहितीच्या सूत्रानुसार मृतक मनोज सुरेश भोयर वय २७ रा . संतोषी नगर लाव्हा हा गुरुवार १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान आपले राहते घरून खर्रा आणण्यासाठी बाहेर गेला परंतु तो घरी वापसच न आल्यामुळे मृतकाच्या वडीलाने शुक्रवार १९ मार्च रोजी मुलगा हरविल्याची तक्रार वाडी पोलीस स्टेशनला दिली होती. मनोज हा व्यंकटेश मार्केटींग शिवाजीनगर वाडी येथे नोकरीवर आहे . बुधवार २४ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान मृतक मनोजचा मृतदेह पप्पू पटेलच्या रेस्ट हाऊस जवळील गडेकार-खापडेकर याच्या शेतातील विहीरीत बुडालेल्या अवस्थेत आढल्याने परिसरात तर्कवितर्क काढत मनोजची हत्या की आत्महत्या या चर्चेला उधाण आले आहे. मनोजची आई कुसूम भोयर यांनी मात्र मनोजची हत्या केल्याचा आरोप केला आहे . पोलिसांनी मृतदेह बाहेर कडून घटनास्थळाचा पंचनामा करून फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक गजानन मोघे पुढील तपास करीत आहे.