विजेचा धक्का बसल्याने तरुणांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ मार्च २०२१

विजेचा धक्का बसल्याने तरुणांचा मृत्यू


विजेचा धक्का बसल्याने तरुणांचा मृत्यू
टेकडी वाडी-खडगांव रोड येथील घटना
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
नवीन घराच्या टेरेसवर लोखंडी हातोडीने भीतीला खिळा ठोकत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
प्राप्त माहितीच्या सूत्रानुसार टेकडीवाडी येथील रहिवासी महादेव अडले यांचे खडगांव रोडवर धनलक्ष्मी ट्रेडर्स नावाचे हार्डवेअरचे दुकान असून त्यांचे मुले हे दुकान सांभाळतात.मृतक गजानन उर्फ श्याम महादेव अडले वय ३४ वर्ष हा सकाळी १० वाजताच्या सुमारास दुकानाच्या थेट समोरील बाजूस इंदिरा नगर खडगांव रोड येथे काही महिन्यांपूर्वीच नवीन घराचे बांधकाम केलेल्या घरी त्याचा लहान भाऊ नंदकिशोर अडले नातेवाईक मधुकर हांडे,निलेश हांडे यांना घेऊन दुकानाला लावलेले बॅनर हवेने हालत असल्याने ते व्यवस्थित करण्याकरिता मृतक व नातेवाईकांना घेऊन गेला टेरेसवर भिंतीला लोखंडी हातोडीने खिळे ठोकत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने मृतकाला बाजूला फेकल्या गेले असता तेथे हजर असलेले मधुकर हांडे व निलेश हांडे यांनी मृतकाचा लहान भाऊ नंदू यास आवाज देऊन वर बोलाविले तेंव्हा मला भिंतीचा करंट लागला,दवाखान्यात घेऊन चल असे मृतकाने सांगताच लगेच त्याला दुचाकीवर बसवून परिसरात असलेल्या पी डी हॉस्पिटलमध्ये नेले असता तो काहीवेळ जिवंत होता.डॉक्टरानी त्याची तपासणी केली असता मृत घोषित केले.ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात वाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.
मृतक श्याम याचे २०१६ मध्ये लग्न झाले असून त्याला एक दोन वर्षाची मुलगी असून पत्नी,आई-वडील व दोन भाऊ आहे.जुन्या दुकानातून नवीन दुकानात सामान बदली करण्याचे काम सुरू होते तर बांधकाम केलेल्या घराचे वास्तुपुजनही झाले नव्हते अशी माहिती पुढे येत आहे.