ट्रक मालकास मारहाण करणारे तीन आरोपीस अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० मार्च २०२१

ट्रक मालकास मारहाण करणारे तीन आरोपीस अटक

ट्रक मालकास मारहाण करणारे तीन आरोपीस अटक .
३९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
ट्रकचे इंजिन दुरुस्तीचे काम दिले असता परस्पर ट्रक मधील साहित्याची विल्हेवाट करणाऱ्या आरोपीस ट्रक मालकाने विचारणा केली असता मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना वाडी पोलीसानी अटक केली आहे.
प्राप्त पोलीस माहितीच्या सूत्रानुसार फिर्यादी अशोक मारकंदे शुक्ला वय ५० वर्ष रा .मंगलधाम सोसायटी, शाहू ले आऊट ,वाडी यांनी गुरुवार १८ मार्च रोजी वडधामना येथील उमा मिस्त्री गॅरेज , गती ट्रान्सपोर्ट समोर वडधामना येथे आपल्या स्वतःच्या मालकीचा आयसर गाडी क्रमांक एम .एच .०४ -सी यु-१०४३ चे इंजिन दुरुस्तीसाठी आरोपी उमा मिस्त्री उर्फ उमाकांत शंकर चौधरी वय ५० वर्ष रा .वैष्णव माता सोसायटी महादेव नगर यांचेकडे विश्वासाने दिली असता गाडीचे मागचे दोन टायर,बॅटरी व त्रिपाल असे एकूण ३९ हजार रुपयाचे साहित्य काढून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग केला.याबाबत ट्रक मालकाने विचारले असता आरोपींने साथीदार आरोपी रवींद्र विजयी यादव वय ५३ वर्ष व संदीप रवींद्र यादव वय १९ रा . सुराबर्डी यांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करून हातबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार देताच तिन्ही आरोपी विरोधात कलम ४०६ , ३२३ , ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून ३९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल सुनील मस्के पुढील तपास करीत आहे .