हिंगणा-वाडीतील भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ मार्च २०२१

हिंगणा-वाडीतील भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश@NCPspeaks प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil व गृहमंत्री ना. @AnilDeshmukhNCP यांच्या उपस्थितीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ नेते रमेश बंग व विजय घोडमारे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला.


माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, नगरसेवक अभय कुणावार, बूथप्रमुख हिंमत गडेकर यांच्यासह हिंगण्यातील ५६ बुथप्रमुखांनी @NCPspeaks मध्ये प्रवेश केला. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष @ishwarbalbudhe1, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, प्रविण मांडे, प्रा.सुरेंद्र मोरे हजर होते.


आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश बंग व विजय घोडमारे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला. 

हिंगणा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. २०२४ साली आपल्याला तिथे विजय मिळवायचा आहे, यादृष्टीने पक्षबांधणी सुरू करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी नवीन पक्ष सदस्यांना केले. भाजप १५ वर्षे विरोधात असताना तुम्ही तो पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. असे असतानाही इतर पक्षातून भाजपात आलेल्यांना तिकिटं देऊन भाजपाने निष्ठावंत नेत्यांवर अन्याय केला. इथे मात्र असे होणार नाही, अशी खात्री पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्याला फार मान आहे. पक्षात कार्यकर्ता जपण्याचे काम होते. योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला संधी इथे मिळेल, असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

याआधी तुम्ही ज्या पक्षात होतात त्या पक्षाला ताकद देण्याचे काम केले, मात्र त्या पक्षात तुमच्यावर अन्याय झाला. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रेम झाडे, माजी नगराध्यक्ष (वाडी नगरपरिषद), अभय कुणावार, नगरसेवक, हिंमत गडेकर, बुथप्रमुख यांच्यासह हिंगणा मतदारसंघातील ५६ बुथप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, प्रविण मांडे, प्रा. सुरेंद्र मोरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.