पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३१ मार्च २०२१

पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा

 पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शासन कराभाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे पोलिसांना निवेदन

 

पुण्यात जनता वसाहत सहकारनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करा आणि पीडित मुलीला न्याय द्याअशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णाजी इंदलकर यांना देण्यात आले. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात आ. माधुरी मिसाळशहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चनाताई पाटील,  प्रदेश महिला मोर्चा सचिव वर्षा डहाळेविनया बहुलीकर यांचा समावेश होता.

राज्यात तरुणीमहिलाअल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होते आहे. पुण्यात घडलेली घटना अत्यंत धक्कादायक असून गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही असेच यातून दिसते आहेअसे श्रीमती खापरे यांनी सांगितले.  

या प्रसंगी नगरसेवक आनंद रिठेनगरसेवक महेश वाबळेपर्वती चे संघटन सरचिटणीस प्रशांत दिवेकर तसेच पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस आशाताई बिबवेरेशमाताई सय्यदगायत्रीताई भागवतसंध्याताई नांदेसोनाली शितोळे- भोसले सारिका ठाकररेणुका पाठकजान्हवी देशपांडेसाधना काळेरुपाली महामुनी उपस्थित होत्या.