पाणी भरलेल्या खड्यात पडून युवकाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मार्च २०२१

पाणी भरलेल्या खड्यात पडून युवकाचा मृत्यू

 शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) : 

तालुक्यातील बेलोरा येथील जनावरे चराईसाठी गेलेल्या  युवकाचा डागा माईन्स परिसरातील पाणी भरलेल्या खड्यात पडून मृत्यू  झाल्याची घटना  आज उघडकीस आली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

 पराग बंडू गाडगे  वय 20 वर्ष राहणार बेलोरा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे तो शासकीय औद्योगीक प्रशिक्षन केंद्र भद्रावती येथे शिक्षन घेत होता.पराग हा शुक्रवारला   शेतात जातो असे म्हणून घरून निघाला होता परंतु तो सायंकाळी घराकडे परत न आल्याने  त्याचा इतरत्र शोध घेतला असता  त्याचा शोध लागला नाही या बाबद भद्रावती पोलिसात हरवलेल्या बाबतची तक्रार करण्यात आली होती. आज पहाटे डागा माईन्स  परिसरातील खड्यातील  पाण्यात कोणीतरी तरंगत असल्याची माहिती मिळाली  तो परागच असल्याचे निष्पन्न झाले.   भद्रावती पोलिसांनी  घटनेचा पंचनामा करून  नेमका मृत्यु कशाने झाला याचा  शोध घेत आहे.