जमनजट्टी परिसरात मुक्तसंचार असलेल्या अस्वलांचा बंदोबस्त करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ मार्च २०२१

जमनजट्टी परिसरात मुक्तसंचार असलेल्या अस्वलांचा बंदोबस्त करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

 जमनजट्टी परिसरात मुक्तसंचार असलेल्या अस्वलांचा बंदोबस्त करायंग चांदा ब्रिगेडची मागणीउपमुख्य वनसंरक्षक यांना निवेदन         अस्वलांचा जमनजट्टी परीसरात मुक्तसंचार असून सकाळी फिरायला जाणा-या नागरिकांवर अस्वल हल्ला करत आहे. एका महिण्यात अशा दोन घटना घडल्या आहे. त्यामूळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता या अस्वलीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक अमोल शेंडे यांनी केली असून या बाबतचे निवेदन त्यांच्या वतीने उपमूख्य वनसंरक्षक यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे गौरव जोरगेवारविशाल सातपैसेदिलीप महाडोळेशुभम वानखेळेशुभम लाकडेअक्षय बनकर आदिंची उपस्थिती होती.
       मागील काही दिवसांपासून लालपेठजमनजट्टी परिसरात अस्वलांची दहशत आहे. सकाळी भ्रमंती करीता जाणा-या नागरिकांवर या अस्वलाने प्राणघातक हल्ले केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. नुकताच या अस्वलाने ६ वाजताच्या सुमारास लालपेठ येथील मधुकर आत्राम यांच्यावर अचानक हल्ला करीत त्यांना जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आत्राम यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जमनजट्टी परिसर हा जंगलाने वेढला असून या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. महिन्याभरात अस्वलीने नागरिकांवर हल्ला केल्याची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली असून वनविभागाने त्या अस्वलीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून अमोल शेंडे यांनी केली आहे. 

Attachments area