चंद्रपूरात अस्वलाचा पुन्हा हल्ला; एक जण जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ मार्च २०२१

चंद्रपूरात अस्वलाचा पुन्हा हल्ला; एक जण जखमी
चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेटबाहेर जमनजेट्टी माना टेकडीजवळ गेलेल्या एकावर अस्वलाने हल्ला केल्याने ते जखमी झाले. मधु गंगाराम आत्राम , लालपेठ जूनी बस्ती , चंद्रपूर असे जखमीचे नाव आहे. ही घटना सकाळी सहा वाजता घङली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पथक पाठविले. जखमीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
मागील अनेक दिवसांपासून माना-लालपेठ परिसरात अस्वलाचा वावर सुरू आहे. मागील आठवड्यात सुनील लेनगुरे, महादेव गुड्डीटीवार जखमी झाले होते.

पठाणपुरा गेटबाहेर या वेकोलिच्या ओव्हरबर्डन परिसरातील झाडीझुडपे तातडीने काढण्याची मागणी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याकडे इको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी केली आहे. पठाणपुरा गेटबाहेरील जमनजट्टी परिसरात 'मॉर्निंग वॉक'करिता नागरिक येत असतात. परिसरात यापूर्वी तीन बिबट २०१३मध्ये पकडण्यात आले होते. मागील वर्षी माना परिसरात वाघाचा वावरही दिसून आला. परिसरात वाढलेले काटेरी बाभळीचे झुडूप यास कारणीभूत ठरत असल्याकडेही धोतरे यांनी लक्ष वेधले आहे.