वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२० मार्च २०२१

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडावरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील महत्वपूर्ण बैंक असलेल्या महाराष्ट्र बैंक येथे दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या वेळेस दरोडा टाकून 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोनं लंपास केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडलेली दिसली असल्याने गावकऱ्यांना चोरीची शंका आली आणि त्यांनी वरोरा पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठून तपासाला सुरुवात केली. लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आल्याचे दिसून आले. तसंच या इमारतीच्या मागच्या बाजूला गॅस सिलिंडर पडून असल्याचे दिसून आले. या दरोड्यात प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला कामाला लावण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. दरोडेखोरांना शोधून काढण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र दरोडेखोरांनी पूर्वनियोजित तयारीने हा दरोडा टाकल्याचे दिसत असल्याने त्यांना शोधणे पोलिसांच्या आवाक्यात असले तरी तारेवरची कसरत करण्यासारखे आहे हे निश्चित. परंतु बैँकेत असलेले सी सी टी वी फुटेज यामुळे पोलिसांना काही सुराग लागू शकतो.