तब्येत बिघडल्याने बंडू धोत्रे रुग्णालयात; अन्नत्याग सत्याग्रह सुरुच - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मार्च २०२१

तब्येत बिघडल्याने बंडू धोत्रे रुग्णालयात; अन्नत्याग सत्याग्रह सुरुचलेखी आश्वासन देण्यात यावे, त्यानंतरच अन्नत्याग सत्याग्रह मागे घेऊ

चंद्रपूर/ प्रतिनिधी
रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ मागील आठ दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले अध्यक्ष बंडू धोत्रे यांची सोमवारी सायंकाळी तब्येत बिघडल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आज पर्यावरणमंत्री महोदयासोबत बैठक पार पडली. त्यांनी अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याची विनंती केली. मात्र अद्याप आंदोलन मागे घेण्यात आले नसून, अन्नत्याग सत्याग्रह सुरुच आहे.

आज झालेल्या बैठकीत मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी बाबत प्रस्ताव सादर करण्यास जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. बैठकीत जिल्हाधिकारी यांचेकडून रामाळा तलाव बाबत एकूण 50 ते 60 कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगीतले. यावर बंडू धोतरे यांनी तलाव सौंदर्यीकरण पुढील टप्पा असून, तलाव खोलीकरण आणि तलावात येणारे नाल्याच्या प्रवाह वळती करणे तात्काळ गरजेचे असल्याचे सांगितले. त्यास इतका निधीची आवश्यकता नसून, या कामासाठी लागणारा जिल्ह्यतील खनिज विकास निधी मधून मंजुरी मा. पालकमंत्री यांनी द्यावे, अशी आग्रही मागणी बंडू धोत्रे यांनी केली आहे. उर्वरित सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविता येईल. शहराच्या सभोवताल असलेल्या खाणीमुळे झालेली पर्यावरण हानी लक्ष्यात घेता, ही कामे या खनिज विकास निधीतून होणे अपेक्षित असल्याचे मत यावेळी बंडू धोत्रे यांनी बैठकीत मांडले. तलावाचे खोलीकरण आणि तलावात येणारे नाल्याचे पाणी वळतीकरण आणि नाले बांधकाम करण्यास आवश्यक निधी मंजुरीबाबत मा. पालकमंत्री यांनी लेखी आश्वासन देण्यात यावे, त्यानंतरच अन्नत्याग सत्याग्रह मागे घेऊ, अशी भूमिका बंडू धोत्रे यांनी घेतली आहे. रामाळा तलावा बाबत मा. आदित्य ठाकरे यांचे आभार मानत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.