प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाले पर्यावरणस्नेही बांबू आय. व्ही. स्टॅन्ड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० मार्च २०२१

प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाले पर्यावरणस्नेही बांबू आय. व्ही. स्टॅन्ड



चिचपल्ली:- ' हिरव सोनम्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूचा कल्पकतेने उपयोग केल्यास तो कसा प्लास्टिक, लाकूड व लोखंडाची जागा घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासोबत रोजगार निर्मितीचा कसा प्रभावी माध्यम होऊ शकतो याचा प्रत्यय नुकताच चिचपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बांधकाम प्रकल्पात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या तसेच बांबूटेक ग्रिन सर्विसेस च्या संचालिका अन्नपूर्ण दुर्वे-बावनकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे लागले आणि त्यांना आय.व्ही. देण्यासाठी स्टॅन्ड नसल्यामुळे खिडकीच्या आधाराने य.व्ही. ची बाटली बांधण्यात आली.

या घटनेवरून बांबू तंत्रज्ञ असलेल्या अन्नपूर्णा दुर्वे यांना लगेच संपूर्ण पर्यावरणस्नेही लोखंड व प्लास्टिक मुक्त बांबू आय.व्ही. स्टँड आरोग्य केंद्रासाठी तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांनी स्थानिक हिरवं सोनं बांबू कारागीर बहुद्देशीय संस्थेच्या सदस्यांशी याबाबत चर्चा केली आणि अतिशय सुबक, आकर्षक, पर्यावरणस्नेही अशा आय.व्ही. स्टँडची निर्मिती करण्याचा निश्चय करून आपल्या कौशल्य व ज्ञानाचा उपयोग करून सामाजिक दायित्व जोपासण्यासाठी एकूण पाच बांबू आय.व्ही. स्टँड प्राथमिक आरोग्य केंद्र साठी तयार करण्यात आले आणि एक छोटेखानी कार्यक्रमात सदर बांबू आय.व्ही. स्टँड आरोग्य केंद्राला सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, सरपंच गिरीजा आत्रामप्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर संगीता भंडारी, रवी सूत्रपवार, चरण कुमरे, गेडाम मॅडम सदस्य ग्रामपंचायत चिचपल्लीइम्रान पठाण, नारायण खपनेबांबूटेक ग्रिन सर्विसेस च्या संचालिका अन्नपूर्ण दुर्वे-बावनकरनिकेश बावणे, भुजंग रामटेके व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.