समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ मार्च २०२१

समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

 समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता

- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

             मुंबईदि. 17 : दुध उत्पादन क्षमतापुरवठा,  रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगरजिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास  तत्वत: मान्यता देत असल्याचे  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

            समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थेचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगरजिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास मान्यता मिळण्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेपशुसंवर्धन मंत्री सुनील केदारयांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रधान सचिव अनुपकुमारसाखर आयुक्त शेखर गायकवाड आदी अधिकारी  बैठकीत उपस्थित होते.

            जालना जिल्ह्याच्या आर्थिकदरडोई उत्पन्नमानव विकास निर्देशांक यात वाढ होण्याच्या दृष्टीने दुध संघाची निर्मिती करण्यात आली. परंतु भांडवल निर्माण करण्यास काही अडचणी निर्माण झाल्याने या संघाची दुध उत्पादकता क्षमता कमी आहे. दुध उत्पादक क्षमता अधिक वाढविण्यासाठीरोजगार क्षमताआर्थिक विकासाच्या दृष्टीने विलीनिकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीत केली. 

            यानुसार शासन स्तरावर नियमानुसार तत्वत: मान्यता देण्याचे व दुध संघाच्या पोट नियमामध्ये  नियमानुसार आवश्यक बदल करण्याचे निर्देश यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.