बाबुपेठ महिला आघाडी तर्फे संघटनात्मक बैठक व स्वच्छतेची पैठणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ मार्च २०२१

बाबुपेठ महिला आघाडी तर्फे संघटनात्मक बैठक व स्वच्छतेची पैठणी

बाबुपेठ महिला आघाडी तर्फे संघटनात्मक बैठक व स्वच्छतेची पैठणी  चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी बाबुपेठ महिला आघाडी तर्फे संघटनात्मक बैठक व स्वच्छतेची पैठणी हा कार्यक्रम हनुमान मंदिर गणेश एजन्सी प्लॉट समता चौक येथे प्रमुख मान्यवरांचा उपस्तिथीत पार पाडला.
      या कार्यक्रमामध्ये महिलांचा सुप्त गुणांना वाव मिडावा व महिलांचा विचारांची देवाण-घेवाण व्यावी या उद्देशाने या कार्यकर्माच आयोजन करण्यात आलं. आधी महिला म्हटल तर चूल आणि मुल या पलीकडे यांचा काही विषयच नव्हता पण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषा बरोबर खांद्याला-खांदा लावून समाजात काम करत आहे.
 या कार्यक्रमामध्ये महिला अध्यक्षा अंजलीताई घोटेकर, नगरसेवक प्रदीपजी किरमे, उपाध्यक्ष किरण बुटले, नगरसेविका शिलाताई चौहान, भाजपा महिला नेत्या प्रभाताई गुढडे, मनीषा माहतव व अर्चनाताई उरकडे उपस्तित होते.
यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संदीप पिंगे, पराग मलोडे,बातोताई, रेखा चन्ने, निर्मला उरकुडे, शुभांगी झोडे, मायाताई पडवेकर, सुचिता उरकुडे, अपेक्षा गुज्जलवार, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अमोल नगराळे तर आभार नगसेवक प्रदीप किरमे यांना मानले.