अनिल देशमुख यांच्याविरोधात मलबार हिल पोलिसांकडे तक्रार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मार्च २०२१

अनिल देशमुख यांच्याविरोधात मलबार हिल पोलिसांकडे तक्रारमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये. अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.  भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली अटक व्हावी,” अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे. 


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परंबिर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशीचे आदेश देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असून तेच याबाबत योग्य तो निर्णय घेतील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे की आज नवी दिल्लीत आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुराव्यासह केलेले आरोप पाहता गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे