पवनीधाबे च्या अलोक शेंडे यांचे अकाली निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२१

पवनीधाबे च्या अलोक शेंडे यांचे अकाली निधन

पवनीधाबे च्या अलोक शेंडे यांचे अकाली निधन

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.12 मार्च.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीमोर तालुक्यातील पवनीधाबे येथील रहिवासी आलोक निळकंठराव शेंडे (वय 46 वर्षे) यांचे दिनांक 11 मार्च रोज गुरुवारला रात्री 11.00 वाजे दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. ते राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ब्रह्मपुरी येथील बस आगारात कंडक्टर या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने शेंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, आई- वडील, पाच भाऊ, एक बहीण व आप्तस्वकीय असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत आज दि.12 मार्च रोज शुक्रवार ला सकाळी 11.00 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.