बैलबंडीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


३० मार्च २०२१

बैलबंडीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी):
बैलबंडी ला धडक देऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ऐन होळीच्या दिवशी रात्री 8 वाजताच्या दरम्यान विजासन केसूर्लीरस्त्यावर घडली या प्रकरनी पोलीसांनी अपघाताचा गून्हा दाखल केला आहे .

मारोती बाजीराव किनाके वय 25 वर्ष राहणार विजासन भद्रावती असे मृतकाचे नाव आहे . तो मजुरीचे कामा साठी गेला असताना परत येत असताना भद्रावती कडून के केसुरली कडे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 3 4- 84 62 जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बैलबंडी ला दुचाकीची धडक दिली धडक इतकी जोरदार होती की मारोती जागीच ठार झाला तर बैल ही जखमी झाले या घटनेची पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून प्रेत शव विच्छेदनासाठी पाठविले पोलिसांनी अपघाताचा गून्हा दाखल केला आहे . पुढील तपास सुरू आहे.