धक्कादायक- वाघाचा बछडा मृतावस्थेत; वन्यप्राण्यांनी खाल्ला शरीराचा भाग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२० मार्च २०२१

धक्कादायक- वाघाचा बछडा मृतावस्थेत; वन्यप्राण्यांनी खाल्ला शरीराचा भाग

file photo


उमरेड- पवनी करांडला अभयारण्य अंतर्गत करांडला नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 363 मध्ये नियमित गस्ती दरम्यान वनरक्षक करांडला यांना सायंकाळी एक वाघाचा बछडा मृतावस्थेत निदर्शनास आला. मृत बछडयाच्या शरीराचा वरील भाग हिंस्त्र वन्यप्राण्यांचे खाल्लेला होता. मृत बछडा हा T1 या वाघिनीचा  असल्याचे निदर्शनास येत आहे. सदरचा बछडा याच परिसरात दोन दिवसांपूर्वी कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आला होता. बछड्याची  आई T1 हिचे वास्तव्य घटनास्थळ परिसरात  असून ती सद्यस्थिती T 9 या नर वाघासोबत  मागील काही दिवसांपासून नियमितपणे राहत असल्याचे सनियंत्रणात आढळून आले आहे. T9 या नर वाघाने सदर बछड्यास ठार मारले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. पुढील कार्यवाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार करण्यात येत आहे.