अचानक झाड अंगावर कोसळल्याने राज्य राखीव दलाचा जवान जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ मार्च २०२१

अचानक झाड अंगावर कोसळल्याने राज्य राखीव दलाचा जवान जखमी


 

#गडचिरोली

मोटारसायकलने जात असताना अचानक झाड अंगावर कोसळल्याने राज्य राखीव दलाचा जवान जखमी झाला. पी.एन. ईप्पर असे जखमीचे नाव असून, ते देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील तुकडीत कार्यरत आहेत. ही घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयासमोर घडली.