धक्कादायक:नागपुरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० मार्च २०२१

धक्कादायक:नागपुरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

 


नागपूर/खबरबात:
नागपूर स्थित गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे 81 वर्षीय कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णाने रंगपंचमीच्या दिवशी कोविड वार्डच्या बाथरूममध्ये ऑक्सीजेन पाईपच्या मदतीने स्वतःला गळफास लावला.

ही घटना सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान समोर आली. पुरुषोत्तम गजभिये वय 81 वर्ष असे या मृतक व्यक्तीचे नाव आहे. ते नागपूर येथील रामबाग परिसरात वास्तव्यास होते.

रविवारी हे रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर उपचार घेत होते. त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास अजनी पोलीस करत आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा बाधित रुग्णांना मानसिक तणावात तर आणत नाही ना? आणि याच तनावातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तर नाही ना?हा देखील आता रूग्णांच्या बाबतीत तपासाचा व संशोधनाचा विषय ठरणार आहे.