सावरगाव,नरखेड येथील ९०शेतकरी थकबाकीतून मुक्त - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, मार्च ०६, २०२१

सावरगाव,नरखेड येथील ९०शेतकरी थकबाकीतून मुक्त

सावरगाव,नरखेड येथील ९०शेतकरी थकबाकीतून मुक्तमहावितरण कृषी  धोरण-२०२०

नागपूर, दिनांक ६मार्च २०२१
महावितणकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी पंप वीज धोरणास जिल्ह्यातील शेतकरी बांधवाकडून मोठ्या प्रमाणात प्रतीसाद मिळतो आहे. महावितरणच्या काटोल विभागातील सावरगाव आणि नरखेड येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात ९० शेतकऱ्यांनी महावितणच्या आवाहनाला प्रतिसाद देत १६लाख ५८ हजार रुपयांचा भरणा केला.
सावरगाव येथे झालेल्या मेळाव्यात महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी कार्यक्रमाच्या   अध्यक्षस्थानी होते.महावितरण कंपनी कडून सुरू असलेल्या योजनेत वसूल होणारा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वीजेचे जाळे मजबूत करण्यावर खर्च होणार आहे. तसेच थकबाकीचा निधी वसूल करण्यात स्थानिक ग्रामपंचायतनी सहकार्य केले तर त्यानाही प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे.यामुळे शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
नागपूर जिल्ह्यातील एक लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कृषी पंपाच्या वीज देयकापोटी कोटयावधी रूपयांची थकबाकी आहे.महावितरणने काढलेल्या योजनेत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. जिल्ह्यातील १३हजार ७८७ शेतकऱ्यांनी सुमारे बारा कोटी रूपयांचा भरणा केला अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती देवकाबाई बोडखे,माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे,अधिक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता राजेंद्रकुमार मलासने उपस्थित होते. यावेळी थकबाकीची रक्कम एकत्रित भरणाऱ्या शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थकबाकी मुक्तीचे प्रमाण पत्र देण्यात आले.
नरखेड येथील मेळाव्यात पंचायत समिती सभापती निलीमा रेवतकर,उप सभापती वैभव दळवी,माजी सभापती वसंत चांडक,माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश रेवतकर उपस्थित होते. यावेळी तिनखेडा ग्रामपंचायत ने सौर कृषी ऊर्जा प्रकल्पासाठी ३५एकर जागा देण्याची तयारी दाखवली. तसा ठरावाची प्रत सरपंच बारई यांनी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्याकडे सुपुर्द केला. 
Attachments area