चंद्रपूर जिल्ह्यात 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर, 699 बाधितांवर उपचार सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० मार्च २०२१

चंद्रपूर जिल्ह्यात 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर, 699 बाधितांवर उपचार सुरू


बाधितांची संख्या 24 हजार 385 वर

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 385 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 285 झाली आहे.  सध्या 699 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 25 हजार 817 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 99 हजार 278 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 401 बाधितांचे मृत्यू झाले आहे. आज बाधीत आलेल्या 63 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 25, चंद्रपूर तालुका 10, बल्लारपूर एक, भद्रावती 11, ब्रम्हपुरी एक, नागभीड एक, सिंदेवाही दोन, मूल एक, राजूरा तीन, कोरपना सहा व इतर ठिकाणचे दोन रुग्णांचा समावेश आहे.