मार्कंडा देवाचे दर्शन घेण्यासाठी प्रती दिन 500 भाविकांना परवानगी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ मार्च २०२१

मार्कंडा देवाचे दर्शन घेण्यासाठी प्रती दिन 500 भाविकांना परवानगी
#कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून #गडचिरोली जिल्ह्यातील #मार्कंडा देवाचे दर्शन घेण्यासाठी प्रती दिन 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.

दरवर्षी महाशिवरात्रीनिमीत्य मार्कंडा येथे भाविक मोठया संख्येने उपस्थित राहतात. कोरोना संसर्गामूळे महाशिवरात्री दिवशी दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आता 13 मार्च पासून दैनंदिन 500 भाविकांना तहसिल कार्यालयाकडून टोकन घेवून मंदीरात प्रवेश दिला जाणार आहे.