घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना बेड्या; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ मार्च २०२१

घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना बेड्या; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त


चंद्रपुरात घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपींकडून चोरीतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी असा एकूण 2 लाख 1 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रूप उर्फ अबीर सोम दत्त,यश रवींद्र फुलझेले,विकास दशरथ भोयरवार, चिराग जयंत आत्राम व वैभव रामदास गाडगे असे अटकेतील आरोपीची नाव आहेत.चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या तसेच घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.या अनुषंगाने रामनगर पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात होते. अशातच रामनगर पोलिसांना घरफोडी करणाऱ्या आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले, त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून 2 लाखांचा वर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मलिक,एकरे, रजनिकांत पुठ्ठावार आदींनी केली.