गोंदिया जिल्ह्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२० मार्च २०२१

गोंदिया जिल्ह्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू

 गोंदिया जिल्ह्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र  नियमित सुरूशिकवणी वर्गावरही बंदी
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.19 :- गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आज दिनांक 19 मार्च ला इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावी चे नियमित वर्ग 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इयत्ता दहावी व बारावी चे नियमित वर्ग covid-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सध्या सुरू असलेले नियमित वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थी एकत्र जमवून शिकवणी वर्ग चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत शालेय शिक्षण पुन्हा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेली असताना, इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी ते आठवी शाळांचे वर्ग देखील 27 जानेवारी 2019 पासून सुरू करण्यात आले होते. मागील काही दिवसात राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे गोंदिया आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाविषाणू मुळे बाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात covid-19 दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत covid-19 मुळे 14 हजार 840 नागरिक बाधित झाले असून, या  आजाराने 187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शाळा नियमित सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील covid-19 या आजाराचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया यांनी 16 मार्चला सभा घेऊन झालेल्या बैठकीमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे नियमित सुरू असलेले वर्ग दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इयत्ता पाचवी ते नववीच्या इयत्ता अकरावीचे शिक्षक ऑनलाइन ऑफलाईन रीतीने अध्ययन-अध्यापन मूल्यमापन शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी शिक्षक नियमित शाळेत उपस्थित राहतील, असे ठरविण्यात आले. तसेच इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग covid-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून नियमित सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी गोंदिया यांना covid-19 चा संसर्ग रोखण्याकरिता सुरु असलेल्या शाळांवर प्रतिबंध घालने व बंद करणे याबाबतची मागणी एका पत्राद्वारे केली होती. जिल्ह्यातील इयत्ता पाच ते नऊ व  इयत्ता अकरावीचे नियमित सुरू असलेले वर्ग दिनांक 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिनांक आज 19 मार्च रोजी काढला आहे. मात्र पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे शिक्षक ऑनलाइन, ऑफलाइन रीतीने विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी नियमित शाळेत उपस्थित राहतील असेही आदेशात म्हटले आहे. हा देश जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, संस्था, समाज कल्याण विभाग द्वारा संचालित आश्रम शाळा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प द्वारा संचालित शाळा या सर्वांना लागू राहील. गोंदिया जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे विद्यार्थी एकत्र जमवून शिकवणी वर्ग चालविण्यास या आदेशाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने शिकवणी वर्ग चालू ठेवण्यावर निर्बंध नसतील. असे या आदेशात म्हटले आहे.