चंद्रपूरकरांवर पुन्हा 30 ते 40% टॅक्स दरवाढ लादल्या जाणार... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ मार्च २०२१

चंद्रपूरकरांवर पुन्हा 30 ते 40% टॅक्स दरवाढ लादल्या जाणार...


महानगरपालिकेतील सत्ताधारी अर्थसंकल्पातील वस्तुस्थिती लपवून जनतेशी खोटे बोलत आहेत...


सामान्य नागरिकांच्या डोक्यावर चंद्रपूर शहर महानगरपालिकेने यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये टॅक्स दरवाढ लादली. अर्थसंकल्पात नमूद नसले तरी 31 मार्च रोजी होणाऱ्या आमसभेच्या अजेंड्या वरून ही बाब स्पष्ट होते.मात्र कोणतीही टॅक्स दरवाढ नसलेला अर्थसंकल्प असे अर्थसंकल्पात लेखी नमूद करून चंद्रपुरकरांची दिशाभूल केली.
जनतेपासून वस्तुस्थिती लपवून मनपातील सत्ताधारी चंद्रपूरकरांशी खोटे बोलत आहेत,असा आरोप जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी 26 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये बोलताना केला.
31 मार्च रोजी होणाऱ्या आमसभेत शौचालयाच्या सेप्टीक टॅंकवर 1 हजार ते 2 हजार रुपये पर्यंत टॅक्स लावण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आलेला आहे. बहुमताच्या जोरावर ही नवी टॅक्स दरवाढ जनतेवर लादण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.त्याचप्रमाणे मनपा मध्ये आधी भाडेतत्त्वावर कर आकारणी करण्यात येत होती.मात्र आता नव्याने भांडवली तत्वावर कर आकारणी करण्यात येणार आहे. भांडवली तत्वावर कर आकारणी केल्यास निवासी मालमत्ता साठी 30 ते 40 टक्के कर वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी फेर मूल्यांकनाचे काम नवीन एजन्सीने सुरू केलेले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने भांडवली तत्वावर कर आकारणीचा विषय प्राधान्याने का घेतला ? महानगरपालिका आडमार्गाने चंद्रपूरातील सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादणार असल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे. आधीच टॅक्स दरवाढीने बेजार झालेल्या चंद्रपूरकरांना भविष्यात पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता यामुळे निर्माण झालेला आहे.