गत 24 तासात 51 कोरोनामुक्त 75 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२१

गत 24 तासात 51 कोरोनामुक्त 75 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

 गत 24 तासात 51 कोरोनामुक्त 75 पॉझिटिव्ह  ; एक मृत्यू



Ø  आतापर्यंत 23,358 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 796


चंद्रपूर, दि. 12 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 75 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 536 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 358 झाली आहे.  सध्या 796 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 28 हजार 62 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख एक हजार 742 नमुने निगेटीव्ह आले आहेत.


आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 364, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.


आज बाधीत आलेल्या 75 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 27, चंद्रपूर तालुका सहा, भद्रावती सहा, ब्रम्हपुरी एक, मूल दोन, वरोरा 29, कोरपना  तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.


कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.