गत 24 तासात 109 कोरोनामुक्त ; 65 पॉझिटिव्ह - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मार्च १६, २०२१

गत 24 तासात 109 कोरोनामुक्त ; 65 पॉझिटिव्ह

 गत 24 तासात 109 कोरोनामुक्त  ; 65 पॉझिटिव्हØ  आतापर्यंत 23,580 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 861

चंद्रपूर, दि. 15 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 65 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 843 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 580 झाली आहे.  सध्या 861 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 32 हजार 524 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख सहा हजार 111 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत 402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 364, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 65 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 21, चंद्रपूर तालुका सात,  भद्रावती 18, ब्रम्हपुरी एक, वरोरा 16, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.