जातवैधता प्रमाणपत्राबाबत 17 मार्च रोजी वेबीनारद्वारे मार्गदर्शन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मार्च २०२१

जातवैधता प्रमाणपत्राबाबत 17 मार्च रोजी वेबीनारद्वारे मार्गदर्शन

 जातवैधता प्रमाणपत्राबाबत 17 मार्च रोजी वेबीनारद्वारे मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 15 मार्च : जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र डताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर कार्यरत असून, समितीद्वारे विज्ञान बारावीचे मागासवर्गीय विद्यार्थी, व्यावसायीक अभ्यासक्रमातील विद्यार्थी, मागास प्रवर्गातून नियुक्त असणारे अधिकारी/कर्मचारी, मागासप्रवर्गातून निवडणूकांकरीता इच्छूक उमेदवार इत्यादींच्या मागणीनुसार  जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येते. संबंधीतांना जलद गतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासनाने ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन सुविधा सुरु केलेली आहे. यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी निर्माण होऊ नये, तसेच  कोणकोणते दस्तावेज सादर करावे याबाबत दिनांक 17 मार्च 2021 रोजी दुपारी 4 वाजता समितीचे उपायुक्त विजयकुमार वाकुलकर हे गुगल मिटद्वारे https://meet.google.com/tyg-rczn-soy या लिंकवर वेबीनारद्वारे मोफत मार्गदर्शन करणार आहेत.

 तरी वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी, महाविद्यालयीन कर्मचारी, प्राचार्य, विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादींनी सदरील वेबीनारमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.