पालकमंत्री वडेट्टीवार बाधित; 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ मार्च २०२१

पालकमंत्री वडेट्टीवार बाधित; 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर

 गत 24 तासात 54 कोरोनामुक्त 

123 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 23,094 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 502




पालकमंत्री विजय वडेट्टीवार यां वडेट्टीवार याना कोरोनाची लागण झाली आहे


चंद्रपूर, दि. 5 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 996 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 94 झाली आहे. सध्या 502 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 19 हजार 777 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 93 हजार 518 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये बल्लारशा येथील 68 वर्षीय महिलेचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.0 0 0