श्रीराम मंदिरासाठी अर्जुनीमोर तालुक्यात 11 लक्ष रुपयाचे समर्पण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मार्च २०२१

श्रीराम मंदिरासाठी अर्जुनीमोर तालुक्यात 11 लक्ष रुपयाचे समर्पण

 श्रीराम मंदिरासाठी अर्जुनीमोर तालुक्यात 11 लक्ष रुपयाचे समर्पणअर्जुनीमोरगाव  तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

संजीव बडोले  प्रतिनिधी.


 नवेगावबांध दि. 6 मार्च:-

 अयोध्येत श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर निर्माणासाठी जग भरातील रामभक्त मोठ्या उत्साहाने समर्पण निधी देत आहेत.या अभियानात तालुक्यातुन 11 लक्ष रुपयांचा समर्पण निधी अयोध्ये करिता पाठविण्यात आला.

  तालुक्यातील 16 जानेवारी ते 27 फरवरी या काळात 141 गावांपैकी 120 गावांमध्ये रामनिधी समर्पण अभियान राबविण्यात आला.या अभियानाला रामभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 11 लक्ष रुपयांचे समर्पण केले.अभियान समाप्ती नंतर समर्पण निधी कुपन पुस्तिका  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भंडारा जिल्हा कार्यवाह मेंढे,बजरंग दल संयोजक देवेश मिश्रा,जिल्हा अभियान कोष प्रमुख मधुकर शेंडे यांचे स्वाधीन करण्यात आले.यावेळी  रामसेवक टोळीचे देवानंद गजापुरे,ओमप्रकाश सिंह पवार,गिरीष बागडे,आनंदराव शाहारे,बळीराम हातझाडे,जयवंत डोये उपस्थित होते.समर्पण निधी देणाऱ्या रामभक्तांचे सर्वांनी आभार व्यक्त केले.या अभियानासाठी पंढरी काशिवार,चंद्रसिंह ठाकूर, मूलचंद गुप्ता,रचना गहाणे, डॉ.गजानन डोंगरवार,लायकराम भेंडारकर ,डॉ.नाजूक कुंभरे, धीरेन जीवानी,विजय कापगते, प्रकाश गहाणे,भोजराज लोगडे सह तालुक्यातील रामसेवकांनी सहकार्य केले.