जि. प. मुख्याध्यापकांची "हॅपी अवर्स" वर चर्चा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० फेब्रुवारी २०२१

जि. प. मुख्याध्यापकांची "हॅपी अवर्स" वर चर्चा
समूह साधन केंद्र वाडी मधील १७ जिप मुख्याध्यापकांचा सहभाग


पंचायत समिती, नागपूर अंतर्गत समूह साधन केंद्र-वाडी मधील जिप शाळेतील मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख तथा प्र. शिक्षण विस्तार अधिकारी शरद भांडारकर यांनी "हॅपी अवर्स" उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सदर उपक्रम शिक्षकांच्या मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

कोविड संसर्गजन्य प्रसार प्रतिबंधक उपाय  त्रिसूत्रीचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करण्यात आले असून शिक्षकांची जबाबदारी वाढलेली असल्याने आभासी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला  अद्यावत ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी शनिवार दि.२० फेब्रुवारी रोजी उच्च प्राथ शाळा, सोनेगाव निपाणी येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यशाळेत वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सप्ताह, ऐकू या गुजगोष्टी, स्वाध्याय अँप, खेळणी व जत्रा,रीड टू मी अँप,रस्ते सुरक्षा, गोष्टींचा शनिवार, ग्रंथालय समृध्दीकरण, बालरक्षक चळवळ, मित्र उपक्रम,नवीन शैक्षणिक धोरण, शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रम, शाळा विकास कृती आराखडा, फिट इंडिया, तंबाखूमुक्त शाळा, समावेशीत शिक्षण, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षा व शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर सरल पोर्टल,आधार अद्यावतीकरण, मोफत पाठपुस्तक योजना, मोफत गणवेश योजना, शालेय पोषण आहार योजना, चार टक्के सादिल अनुदान, समग्र शिक्षा, द्विभाषिक पुस्तके, भाषा, विज्ञान व गणित पेटीचा वापर, शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम, 100 टक्के विद्यार्थी उपस्थिती, शाळेच्या भौतिक गरजा व बांधकाम दुरुस्ती इत्यादींबाबत आढावा घेण्यात आला. सभेला सर्वश्री प्रवीण मेश्राम ,अरुण मोहने, कमलाकर उताने, अनिल गेडाम,मोहिनी वैरागडे ,जिजा लाखे,माधुरी घोरमाडे ,प्रियदर्शिनी मोंदेकर,आशा दावळे, कुसुम कडसकर, आशा सोमकुवर उमा चौधरी, युवराज उमरेडकर

साहेबराव मोहारे, पुरुषोत्तम चिमोटे ,अनिता पाटील, मंजुषा काकडे इत्यादी उपस्थित होते