नारियल पाणी विकणाऱ्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ फेब्रुवारी २०२१

नारियल पाणी विकणाऱ्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती) :
नागपूर -चंद्रपुर मुख्य मार्गावर नारियल पाणी विकणाऱ्या युवकाने आपल्या गोदामात गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजता  उघडकीस आली . याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

 आनंद यादव वय 26 वर्ष राहणार जोनपुर  युपी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून हा उदय  लॉज समोरील भागात  नारियल पाणी विक्री करण्याचे काम करीत होता  त्याच्याच बाजूला यांचे गोदाम असून त्या गोदामात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती सुनील सिंग पवार यांना होताच घटनास्थळी  पोलीस उपनिरीक्षक गजानन तेलरांधे हे पोहचले घटनेचा पंचनामा करून आत्महत्या नेमकी कशाने केली याचा तपास पोलिस करीत आहे.