चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१४ जणांचा मृत्यू #tiger #death #man - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ फेब्रुवारी २०२१

चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१४ जणांचा मृत्यू #tiger #death #man
नागपूर- राज्यभरात २0१७ ते २0२0 या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना २६ कोटी रुपयांची भरपाईची रक्कम देण्यात आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे यासदंर्भात माहिती मागविली होती. त्यांना दिलेल्या लेखी उत्तरातून उपरोक्त बाब पुढे आली आहे. वर्ष २0१७ ते २0२0 या चार वर्षाच्या काळात वन्यप्राण्यांच्या झालेल्या हल्ल्यांमध्ये वाघाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या अधिक आहे. त्यात २0१७ मध्ये २४, २0१८ मध्ये १५, २0१९ मध्ये २४ आणि २0२0 मध्ये ३८ आहे. त्यापाठोपाठ बिबट्यांच्या हल्ल्यात अनुक्रमे १४, ११, ८ आणि ३२ जणांचा मृत्यू झाला. बहुतांश मृत्यू जंगलालगत असलेल्या गावकर्‍यांचे आहेत. अभयारण्याच्या शेजारी असलेले पाणवठे आणि नद्या, तलावांमध्ये असलेल्या मगरांमुळेदेखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे यात दिसते. जंगल क्षेत्राला लागून असलेल्या गावांमधील गायी, म्हशी, बकर्‍या व अन्य पाळीव प्राण्यांवरदेखील वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे. चार वर्षात ३0, ४३९ प्राणी मृत्युमुखी पडले तर ४६४ प्राणी जखमी झाले.


वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी व मृत पशुधन
आर्थिक वर्ष..... मृत जखमी
२0१६-१७ ----५९६----१ ९२
२0१७-१८ ----६९0९
---- ११0
२0१८-१९ ----८३११ ----१६९
२0१९-२0 ----९२५----८ ९३

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झालेले मानवी मृत्यू
वर्ष ----मृत्यू ----भरपाईची रक्कम
२0१७ ----५४---- ४ कोटी ३२ लाख
२0१८---- ३३ ----३ कोटी १२ लाख
२0१९ ----३९---- ५ कोटी ८५ लाख
२0२0 ----८८ ----१२ कोटी ७५ लाख