वाघाच्या हल्ल्यात केळझर येथिल दोन बैल ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ फेब्रुवारी २०२१

वाघाच्या हल्ल्यात केळझर येथिल दोन बैल ठार

वाघाच्या हल्ल्यात केळझर येथिल दोन बैल ठार
मूल - तालुक्याच्या केळझर येथिल रवींद्र कवठे यांच्या मालकीचे दोन बैलाना वाघाने ठार केल्याची घटना काल रात्रौच्या सुमारास घडली.
रवींद्र कवठे यांनी गावाला लागूनच असलेल्या स्वतःच्या शेतात रवींद्र कवठे या शेतकऱ्याने तीन बैलांना बांधून ठेवले होते. मात्र दबा धरून बसलेल्या वाघाने काल रात्रौच्या सुमारास दोन बैलांना हल्ला करून जागीच ठार केले तर एक बैल दोर तोडून पडाला. सकाळी शेतकरी शेतात गेला असता ही घटना लक्षात आली.  रवींद्र कवठे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनेचा पंचनामा करीत आहे.
         या घटनेने केळझर गावात वाघाच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.