शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणी निवड सभा संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ फेब्रुवारी २०२१

शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणी निवड सभा संपन्न

शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणी निवड सभा संपन्न


शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर डोंगरवार यांची निवड.

जिल्हा कार्यकारिणी निवड सभा संपन्न.

कर्मचाऱ्यांचे नेते र.ग.कर्णिक यांना श्रद्धांजली.

सरचिटणीस संदिप मेश्राम व कार्याध्यक्ष डी.एच. चौधरी.
संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.8फेब्रुवारी :-

शिक्षक समिती गोंदिया च्या जिल्हा कार्यकारिणीची निवड सभा (७ फेब्रुवारी)विजयजी कोंबे सर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांचे अध्यक्षतेखाली, महेंद्र भुते राज्य कार्यकारिणी सदस्य,राजु निभोरकर संघटक यांचे उपस्थितीत घेण्यात आली.नुतन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यासंदर्भात संपन्न झालेल्या सभेत नव्याने सन २०२१ ते २०२४ या कालावधीसाठीनवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. सभेची सुरुवात सर्व संघटनांचे मार्गदर्शक स्व.र.ग.कर्णिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.यावेळी जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली .शिक्षक समिती गोंदिया चे जिल्हाध्यक्षपदी किशोर डोंगरवार यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच जिल्हा सरचिटणीस संदिप मेश्राम,जिल्हाकार्याध्यक्ष डी.एच.चौधरी उर्फ काकाजी, जिल्हा उपाध्यक्षपदी जी.ई. येडे,सुरेश कश्यप,गौतम बांते,वाय.आय. राहांगडाले, एम.पी.म्याकलवार, राधेश्याम ठाकरे,भावेश शहारे,नरेश मेश्राम. कोषाध्यक्षपदी वाय.पी.लांजेवार, प्रसिद्धी प्रमुख कैलाश हांडगे, कार्यालयीन चिटणीस मुकेश राहांगडाले, बि.एस.केसाळे, जिल्हा सहसचिव शरद पटले ,टी.पी.शहारे, विशाल कच्छवाय, दिलीप नवखरे, उत्तम गजभिये,भरत भेंडारकर, दिपक कापसे,. मुख्य संघटक उमेश राहांगडाले, मिथून चव्हाण,एस.टी.भालेकर दिवाकर नागोसे,यु.जी.हरिणखेडे,सी.जे.हेमके,. जिल्हा महिला प्रतिनिधी सुनंदा शंभरकर,दिक्षा फुलझेले,अल्का बडवाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.लवकरच जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार केला जाईल असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी कळविले आहे. यावेळी राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन वाय.पी.लांजेवार तर आभार संदिप तिडके यांनी मानले.
समस्त नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीचे शिक्षक समितीचे आधारस्तंभ मनोज दिक्षीत यांनी सस्नेह मन:पूर्वक अभिनंदन करित...शिक्षक समितीचा विचार सामान्य शिक्षक व विद्यार्थी यांचे पर्यंत पोहचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या..
  शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला
 प्राधान्य देणार :-जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या जिल्हा परिषद व शासन स्तरावर प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार असून सर्व शिक्षकांना विचारात घेऊन कामे केल्या जातील अशी ग्वाही नवनियुक्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी दिली आहे.ते पूढे म्हणाले , जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत कार्यरत शिक्षकांची १५ टक्के प्रमाणे नक्षलभत्ता प्रकरण, संपकालीन तीन दिवसांचे वेतन,नियमित वेतन, भविष्य निर्वाह निधीची नोंदी प्रकरणे अशा अनेक समस्या प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी सांगितले.