लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीने त्या मुलासोबतचे फोटो केले डिलीट; ‘लक्ष्या’ची मुलगी सध्या करते तरी काय?  - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ फेब्रुवारी २०२१

लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीने त्या मुलासोबतचे फोटो केले डिलीट; ‘लक्ष्या’ची मुलगी सध्या करते तरी काय? 

लक्ष्मीकांत बेर्डे हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहेत. ‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही.

मध्यमवर्गीय कुटूंबात जन्मलेल्या लक्ष्मीकांत यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. चाळीत त्यांचे बालपण गेले. त्यांनी दोन लग्न केले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच ते त्यांच्यापासून वेगळे झाले होते. 

चे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. 
- अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते. 

- अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनयने ती सध्या काय करते या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदी 17 वर्षांची असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे.

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी गेले काही दिवस चर्चेत होती. स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये स्वानंदी म्हणते, ‘ तुझ्या चेह-यावरचं हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की एकटीला भिती वाटते आहे.’ 
यानंतर काही काळाने तिने ही पोस्ट डिलीटही केली. पण त्यानंतर तिच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. यावर प्रिया बेर्डे यांनी मात्र खुलासा केला आहे.  ‘स्वानंदी आणि प्रेम हे चांगले मित्र आहेत. नुकताच प्रेमचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने स्वानंदीने ती पोस्ट लिहिली होती’ असे प्रिया बेर्डे म्हणाल्या. स्वानंदी आणि प्रेम हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.’