डेरा आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ फेब्रुवारी २०२१

डेरा आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

डेरा आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा जना विकास कामगार संघाचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू आनंद देशमुख यांचे नेतृत्वात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशे कोविड योध्दे कंत्राटी कामगारांना सात महिन्यांचे थकीत पगार व किमान वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी ८ फेब्रुवारी २०२१  पासून जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर मुलं-बाळ व कुटुंबासह सुरू असलेल्या डेरा आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला. आंदोलनाचा आज विसावा दिवस होता. या आंदोलनाला राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ चंद्रपूर च्या शिष्टमंडळाने भेट दिली. या मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले यांचेसह पदाधिकारी दिलीप रिंगणे,भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, शैलेश जुमडे, चिराग नथवाणी व सतिश सिडाम यांचा शिष्टमंडळा मध्ये समावेश होता. चंद्रपूर मधील योद्धा संघटनेचे शेखर गोवर्धन, अनुज घोटेकर, प्रणित भगत,चंदन जगताप, कपिल भगत,संदीप देव,मयूर साठे यांनी सुद्धा डेरा आंदोलनाला भेट  पाठिंबा दिला.सामाजिक कार्यकर्ते चिराग नाथवाणी यांनी डेरा आंदोलनातील सर्व आंदोलनकर्त्या कामगारांना फळे वाटप करून सहकार्य केले. काल या आंदोलनाला विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष नागपूर उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट नीरज खांदेवाले,माजी कार्याध्यक्ष एडवोकेट स्वप्नजीत सन्याल तसेच वि.रा. आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष सनी तेलंग यांनी पाठिंबा जाहीर केला होता.