स्टेट बँक आवाळपूर शाखेतील कर्मचारी यांचा मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ फेब्रुवारी २०२१

स्टेट बँक आवाळपूर शाखेतील कर्मचारी यांचा मनमानी कारभारामुळे जनता त्रस्तआवाळपूर :-
परिसरात राष्ट्रीय कृत बँक नसल्याने अल्ट्राटेक वसहितीतील बँक मध्ये नागरिकांना जावे लागते. परिसरातील नागरिकांची खात्याची संख्या सुध्दा जास्त असल्याने नेहमीच रेलचेल असते मात्र येथील कर्मचारी यांचा मनमानी करभारा मुळे जनता त्रस्त झाल्याची निदर्शनास येत आहे.

आवारपूर, नांदा फाटा, बिबी, पालगाव, नोकरी. हिरापूर, संगोडा, अंतरगाव, तलोधी, राजूरगुडा, लालगुडा, कढोली या गावाची लोकसंख्या जवळपास अंदाजे ५० हजार आहेत. या सर्व गावाना जोडणारी एकमेव राष्टीयकृत बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया हि आवाळपूर वसाहतीत आहेत. मजूरदार, शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, या सर्वाचे खाते या राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. दिवसभर तुडुंब गर्दी बँकेत असते. सर्वाचंच नंबर लागेल याची काही शास्वती नसते. दैनदिन व्यवहाराकरिता मानवाला पैशाची गरज असते. त्यामुळे नागरीक पैसे काढण्यासाठी व टाकण्यासाठी व शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेणारे शेतकरी ,शेतमजूर, वयोवृद्ध निराधार महिला यांचेही खाते याच बँकेत असल्यामुळे नागरिकांना मजुरी सोडून नांदा फाटा येथून दोन किमी पायदळ जावे लागते तिथे गेल्यावरही कर्मचारी यांचे कडून वेगवेगळे कारण सांगून नाहक त्रास होत असून गेल्या पावली परत यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

स्टेट बँकेचा एका कर्मचारी यांनी उद्धटतेचा बाबतीत कळस गाठला असून नेहमी उद्धट वागत असल्याने नागरिकांना मध्ये त्यांचा विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. अनेक दिवसापासून उद्धट वागणुकीची तक्रार असली तरी वरिष्ठांचा आशीर्वादने असे वागत असल्याची चर्चा जनसामान्यात रंगली आहे.

बँक अल्ट्राटेक वसाहतीत असल्याने तेथील कामगारांना चांगली वागणूक दिल्या जाते. मात्र या उलट गावातील नागरिकांना वेगळी वागणूक देत असल्याने बँक ही फक्त कंपनी वसाहतीची आहे की काय? असा सामंजस्य प्रश्न नागरीकांना पडला आहे.

(विषेश म्हणजे परीसारतील नागरिकांची मागील अनेक वर्षा पासून नांदा फाटा येथे राष्ट्रीयकृत बँक व ए.टी.एम ची मागणी आहे. परंतु या सामान्य जनतेचा ज्वलंत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? कि नुसत्या मताच्या राजकारनासाठी उद्देश साधतील.)