रजत मानापुरे चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ फेब्रुवारी २०२१

रजत मानापुरे चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा

रजत मानापुरे चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.2 फेब्रुवारी:-
कोरोना महामारी विरुद्ध महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम दिनांक 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर 2020 दरम्यान लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा वैयक्तिक व संस्था स्तरावर घेण्यात आली होती. सदर स्पर्धा जिल्हास्तरावर व आमदार मतदार संघ अशा दोन विभागात घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांनी वैयक्तिक स्तरावरील पुरस्कार पात्र विद्यार्थ्यांची निवड जाहीर केली आहे. त्यात येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा 11वी कला शाखेचा विद्यार्थी रजत भास्कर मानापुरे याची जिल्हा स्तरावर दुसऱ्या क्रमांकासाठी चित्रकला स्पर्धेत निवड झाली आहे. त्याला 2000 रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन अर्जुनीमोर गटशिक्षणाधिकारी आर.डी. मांढरे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राठोड व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल रजतचा सर्वत्र गौरव होत आहे.