घरगुती सांडपाणी जमीनीमध्ये मुरून रामाला तलाव प्रदूषित; कार्यवाही करण्याच्या सूचना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ फेब्रुवारी २०२१

घरगुती सांडपाणी जमीनीमध्ये मुरून रामाला तलाव प्रदूषित; कार्यवाही करण्याच्या सूचना
चंद्रपूर/प्रतिनिधी
रामाळा तलाव शहरातील सांडपाणी मुळे प्रदूषित असल्याचे आज इको-प्रो ला प्राप्त झालेल्या पत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ने नमूद केले आहे.
सद्य:स्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेकडे शहरामधील निर्मित घरगुती सांडपाणी वाहून नेणान्या बंदिस्त गटार नालीचे जाळे पूर्णपणे अस्तित्वात नाही. त्यामुळे काही प्रमाणात अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी तलावामध्ये , लगतच्या नदीमध्ये मिसळल्या जाते व उर्वरित अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी जमीनीमध्ये मुरून भू - जल सुद्धा प्रदूषित होत आहे, यावर तातङीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून केल्या आहेत.

ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण करून सौंदर्याकरण करण्याच्या मागणीला घेऊन इको प्रो च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. यासंदर्भात इको- प्रोच्या निवेदनाची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला सूचना दिल्या आहेत.
रामाळा तलावाच्या खोलीकरण तसेच सौंदर्याकरणाबाबत वेळोवेळी आढावा बैठकजिल्हाधिकारी , चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या आहेत. सदर बैठकीदरम्यान ऐतिहासिक रामाळा तलाव परसिरालगतच्या नागरी वसतीतील अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी नाल्याद्वारे तलावामध्ये मिसळते. तसेच तलाव भरल्यानंतर अतिरिक्त पाणी ओसंडून लगतच्या झरपट नदीमध्ये मिसळते. झरपट नदी ही पुढे वाहून इरई नदीत मिसळते, असे स्पष्ट दिसून आले.
राष्ट्रीय हरीत लवाद नवी दिल्ली यांचे दि . २८ / ०८ / २०१९ रोजीच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी शहरातून निर्मित १०० टक्के घरगती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रक्रिया सयंत्रणा उभारणे , शहरामध्ये बंदिस्त गटार नालीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र, सद्य : स्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेकडे शहरामधील निर्मित घरगुती सांडपाणी वाहून नेणान्या बंदिस्त गटार नालीचे जाळे पूर्णपणे अस्तित्वात नाही त्यामुळे काही प्रमाणात अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी तलावामध्ये , लगतच्या नदीमध्ये मिसळल्या जाते व उर्वरित अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी जमीनीमध्ये मुरून भू - जल सुद्धा प्रदूषित होत आहे, यावर तातङीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला केल्या आहेत.


"चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाला तलावात येणारे सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे, हे स्पष्ट आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून अनेक नागरिक मंडपात येउन तक्रार करित आहे. तलावातील आणि परिसरातील भूजल प्रदूषित होऊन सुद्धा नगर व जिल्हा प्रशासन गंभीर दिसून येत नाही, याकडे नागरिकांनी आता भूमिका घेणे आवश्यक आहे."

- बंडु धोतरे,
अध्यक्ष, इको- प्रो