कुंचल्यातून व्यक्त केली रामाळा तलावाच्या प्रदूषणाची भीषणता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ फेब्रुवारी २०२१

कुंचल्यातून व्यक्त केली रामाळा तलावाच्या प्रदूषणाची भीषणता

रामाला तलावाच्या रक्षणार्थ चित्रकारांनी हाती घेतला कुंचला

बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी चित्रकारांनी केली पेंटिंग

चंद्रपूर/ प्रतिनिधी
ऐतिहासीक गोंडकालीन रामाळातलाव प्रदूषण मुक्त व खोलीकरण करण्यासह इतर मागण्या घेऊन इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे रामाळा तलाव येथे अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील जिल्हा कलाध्यापक संघाच्यावतीने पेंटिंग काढण्यात आली. यातून त्यांनी जलप्रदूषण झाल्यास अशी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते याचे चित्रण केले.
गुरुवार दि.25/02/2021 ला सकाळी 7:30 वाजता कला शिक्षक दाखल झाले. तलावाच्या काठावर बसून त्यांनी जलप्रदूषण, पाण्याचे महत्व आणि शहराचा इतिहास आपल्या कुंचल्यातून अधोरेखित केला. रामाळा तलाव प्रदूषण मुक्त होवो, या करिता स्वइच्छेने पोस्टर निर्मिती करून सत्याग्रहास समर्थन दर्शविले. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा कालाध्यापक संघ चंद्रपूरचे अध्यक्ष किरण पराते, सचिव कार्तिक नंदूरकर, विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन बारापात्रे, शहर अध्यक्ष योगेश पेंटेवार, किरण कंत्रोजवार, देवा रामटेके , स्वामी साळवे, संजय अंडर्सकर, संजय सोनुने, शशिकांत वांढरे, सुहास दुधलकर, सुहास ताटकंटीवार तसेच इतर कलाशिक्षक उपस्थित होते.