जिल्हा परिषद विद्यालय नवेगावबांध येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ फेब्रुवारी २०२१

जिल्हा परिषद विद्यालय नवेगावबांध येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

जिल्हा परिषद विद्यालय नवेगावबांध येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्नस्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान.


विजेत्यांना दिले रोख पारितोषिक.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि. 25 फेब्रुवारी:-


सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग गोंदिया यांच्या वतीने स्पर्श कुष्ठ रोग व क्षयरोग जनजागृती अभियानांतर्गत येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यालयाचे श्रेयस उके, गायत्री कवरे, नरेंद्र गजबे यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला, या गटाला सातशे रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक गट क्रमांक 2 वैभव लांजेवार, सुंदर धारगावे ,अंकिता उरकुडे या गटाने पाचशे रुपयाचे रोख पारितोषिक पटकावले.तर साहिल चौधरी यास्मिन पठाण विशाल दोनाडकर यांनी तीनशे रुपयाचे रोख पारितोषिकाचे तिसरा क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले आहे. या विजेत्या स्पर्धकांचे मुख्याध्यापक राठोड व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.