पॉर्न क्लिप सेक्स प्रकरणातील तरुणीला सशर्त जामीन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ फेब्रुवारी २०२१

पॉर्न क्लिप सेक्स प्रकरणातील तरुणीला सशर्त जामीन
नागपूर- दहेगाव (रंगारी) येथील एका हॉटेलमध्ये खूर्ची खाली पडल्याने फास आवळला गेला व तरुणाचा मृत्यू झाला. खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. हे प्रकरण पॉर्न क्लिप बघितल्याने घडल्याचे उघडकीस आल्याने या सेक्स प्रकरणातील तरुणीला सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणात जामीन मिळावा म्हणून तीने सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता.


मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर होता. हा तरुण विवाहित होता. दोन वर्षांपासून त्याचे 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना माहित होते. तो गुरुवारी दुपारी छोट्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे जाणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर त्याला तरुणीचा फोन आला होता. त्यानंतर तो कामानिमित्ताने सावनेरला जात असल्याचे त्याने घरच्याना सांगितले होते. पण संध्याकाळ झाली तो परतला नाही. फोन केल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रात्री 10 वाजता त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली, असेही त्याच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मृत तरुण आणि तरुणीने शुक्रवारी दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होते. दोघांनी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या लॉजवरील एक खोली बुक केली होती. 
दहेगाव (रंगारी) येथे ७ जानेवारी रोजी एका हॉटेलमध्ये २0 वर्षीय आरोपी तरुणी व २९ वर्षीय प्रेमी तरुण सेक्स करण्यासाठी आले होते. 
तिथे गेल्यानंतर दोघांनी शाररिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शाररिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले होते., त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा आवळण्यात आली होती. या पोझिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली. असता तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता. त्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्याची प्रेयसी जेव्हा बाथरूमच्या बाहेर आली, तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.


त्यानंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर तरुणीला अटक करण्यात आली होती. आज नागपूर सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी तरुणीला जामीन दिला आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी अद्याप बाकी आहे. 
 याप्रकरणी न्यायाधीश एस.एस. देशपांडे यांनी हा निर्णय दिला. आरोपी तरुणीतर्फे अँड. अपूर्वा धवनकर व अँड. एस.टी. चव्हाण यांनी बाजू मांडली.