नवरीचे फोटो काढताना नवरदेवाने फोटोग्राफरला बदडले; - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ फेब्रुवारी २०२१

नवरीचे फोटो काढताना नवरदेवाने फोटोग्राफरला बदडले;

नवरीचे फोटो काढताना नवरदेवाने फोटोग्राफरला बदडले; आणि नवरीचे काय झाले, व्हिडीओ बघून येईल हसू 

नवरीचे फोटो काढत असताना फोटोग्राफरने तिला स्पर्श केल्याचे बघून नवरदेव भारीच संतापला आणि त्याने तिथेच त्याने बदडले. आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मारल्याचे कळताच तिने मंचावरच पोट खळखळून हसायला सुरुवात केली. तिचे हे हसणे बाजूच्या एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नसले तरी नवरीच्या दिलखुलास हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सुरुवातीला रागात असलेला नवरदेव नवरीचे हसणे बघून नंतर तोही हसताेय. तर दुसरीकडे चोप बसलेल्या कॅमेरामॅनलासुद्धा आपले हसणे आवरलेले नाही. तोही नवरीसोबत हसताना दिसत आहे. 


हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.👇