नाना पटोलेंच्या "त्या" वक्तव्याचा एका आमदाराने घेतला खरपूस समाचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ फेब्रुवारी २०२१

नाना पटोलेंच्या "त्या" वक्तव्याचा एका आमदाराने घेतला खरपूस समाचारदेशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात केलेली टीका ही पटोले यांच्या विकृत मनोवृत्तीचे उदाहरण आहे. पटोले यांना मोदी द्वेषाने पछाडले आहे, असे उत्तर आमदार परिणय फुके यांनी दिले आहे.

मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं' अशा शब्दांत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिल्ली दौरा आटोपून नागपुरात परतलेल्यानंतर नाना पटोले यांचं जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.

त्याला उत्तर देताना आमदार परिणय फुके म्हणाले,मा. श्री. मोदीजी आणि आमचे नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याऐवजी पटोले यांनी आधी आपले घर दुरुस्त करावे. त्यांच्या निवडीमुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांची त्यांनी समजूत घालावी. आक्रस्ताळेपणा आणि विरोधकांना त्रास देणे हा पटोले यांचा स्वभाव आहे.  त्यांनी हे काम असेच प्रामाणिकपणे करावे. आम्ही मात्र आमच्या लोकसेवेचे कार्य असेच अखंडितपणे सुरू ठेऊ. पटोले यांना आमच्या शुभेच्छा, असेही आमदार परिणय फुके यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.