पवनीधाबे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पपीता नंदेश्वर तर पराग कापगते उपसरपंच #Papita Nandeshwar #Sarpanch #Parag Kapgate #Deputy Sarpanch - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ फेब्रुवारी २०२१

पवनीधाबे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पपीता नंदेश्वर तर पराग कापगते उपसरपंच #Papita Nandeshwar #Sarpanch #Parag Kapgate #Deputy Sarpanch

पवनीधाबे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पपीता नंदेश्वर तर पराग कापगते उपसरपंच


संजीव बडोले प्रतिनिधी .

नवेगावबांध दि. 12 फेब्रुवारी:-
अर्जुनीमोर तालुक्यातील पवनीधाबे ग्रामपंचायतिच्या सरपंचपदी पपीता नंदेश्वर यांची तर उपसरपंचपदी पराग कापगते यांची निवड झाली आहे.
आपसातील मतभेद विसरून ग्रामविकासाच्या कामाला लागूया अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत पवनीधाबे च्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी आज (ता. 12) निवडणूक घेण्यात आली. यामध्ये पपिता नंदेश्वर ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उपसरपंच पदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. पराग कापगते यांना 5 मते मिळाली. त्यांनी त्यांचे निकटतम प्रतिद्वंद्वी दीपिका चुटे यांचा 1 मताने पराभव केला. निवडणूक सभेच्या सुरुवातीपासूनच सदस्य आणि गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. दरम्यान गावकर्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. फटाके फोडून गावात आनंद व्यक्त करण्यात आला.
अध्यासी अधिकारी म्हणून तलाठी सुरेश हरिणखेडे यांनी काम पहिले. यावेळी तलाठी श्रीमती ए. बी. बिसेन आणि ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी सहकार्य केले.
नरेश आदमने, डॉ. शैलेंद्र भांडारकर, कलीराम काटेंगे, आनंदराव डोंगरवार, विलास राऊत, शिवाजी कमरो, मिताराम दररो, नारायण उरकुडे, हिवराज शहारे, हरिदास टेम्भूरणे, राजेंद्र टेम्भूरणे, श्यामराव नंदेश्वर, कुशन इसकापे, रमेश राऊत, कैलास नंदेश्वर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.