मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन दिवसात दहा लाख दंड वसूल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ फेब्रुवारी २०२१

मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन दिवसात दहा लाख दंड वसूल

 मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन दिवसात दहा लाख दंड वसूल


               चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी :  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे व गर्दी न करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गैरजबाबदार नागरिकांवर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली असून दि. 19 फेब्रुवारी  ते 21 फेब्रुवारी 2021 या तीन दिवसात प्रशासनाने 1337 आस्थापनांना भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या 20 आस्थापनांवर 39 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तर मास्कचा वापर न करणाऱ्या 4625 नागरिकांकडून रु.9 लाख 86 हजार 540 दंड वसूल करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी कळविले आहे.