अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी आहे पत्रकार; परिचय वाचून व्हाल थक्क ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ फेब्रुवारी २०२१

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी आहे पत्रकार; परिचय वाचून व्हाल थक्क !

वांगमई पारकाला सध्या एका नॅशनल वृत्तपत्रामध्ये सिनियर रिपोर्टर म्हणून काम पाहातात. त्या प्रामुख्यानं कला, लाइफस्टाईल, टेक्नॉलॉजी आणि पुस्तकांबद्दल लिहितात. सुरूवातीच्या काळात त्यांनी भारत तसेच परदेशात अनेक वृत्तपत्रांसाठी लेखन केलं आहे. कॅमेऱ्यासमोर त्या स्वतःला कमी आणतात आणि पडद्यामागचं काम करण्याची त्यांना आवड आहे. कदाचित याच कारणामुळे त्या फारशा लोकांच्या नजरेत आलेल्या नाहीत. ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी आहे.
अर्थसंकल्पाचं अनावरण होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी आपल्या परिवारासमवेत संसदेत आल्या. सीतारामन यांचे पती पॉलिया स्टडीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक पारकाला प्रभाकर यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र, सीतारामन यांची मुलगी वांगमई पारकाला हिनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

इंग्रजी साहित्यात दिल्ली विद्यापीठातून कला आणि पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर त्यांनी अमेरिकेत पत्रकारिता विषयातील मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन केली. त्यांनी मासिक आणि फोटो जर्नलिझममध्ये स्पेशलायझेशन केलं असल्याची आहे.