केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


०६ फेब्रुवारी २०२१

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार


केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रात पुढील आठवड्यात प्रदेश भाजपातर्फे प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदा व विशेष निमंत्रितांची संमेलने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.

एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे. ह्या अर्थसंकल्पातील तरतुदी अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाने देशभर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानुसार सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा तसेच विशेष निमंत्रितांची संमेलने आयोजित करण्यात येत आहेत.

   या कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामनदि. 6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन मंत्री मा. नितीन गडकरी हे वर्धा येथे तसेच पुण्यामध्ये केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मा. प्रकाश जावडेकरकेंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीसप्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटीलविधान परिषद विरोधी पक्षनेते मा.प्रविण दरेकरमाजी मंत्री मा.सुधीर मुनगंटीवारतसेच अन्य पदाधिकारी हे पत्रकार परिषदा तसेच विशेष संमेलने घेतील अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.